महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सहाव्या समन्सकडेही केजरीवालांची पाठ

06:31 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तपास यंत्रणांनी न्यायालयाच्या #socialनिर्णयाची प्रतीक्षा करावी : आप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहिले नाहीत. केजरीवाल यांना एजन्सीद्वारे जारी केलेले सहावे समन्स ‘बेकायदेशीर’ असल्याचा दावा करत ईडीने केजरीवाल यांना वारंवार समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 फेब्रुवारीला सहावे समन्स पाठवले होते. या समन्सनुसार त्यांना 19 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले. यापूर्वी ईडीने केजरीवाल यांना या वषी 3 जानेवारी, 18 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी आणि गेल्यावषी 2 नोव्हेंबर आणि 21 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते.

अनेकवेळा समन्स बजावूनही केजरीवाल चौकशीत सहभागी झाले नसल्यामुळे ईडीने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय एजन्सीने दाखल केलेल्या तक्रारीच्या संदर्भात न्यायालयाने शनिवारी केजरीवाल यांना वैयक्तिक हजर राहण्यापासून दिलासा दिला होता. दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 15 फेब्रुवारीपासून सुरू झाले असून ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. पुढील सुनावणीच्या तारखेला 16 मार्च रोजी ते वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर होतील, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली आहे. त्यानुसार ईडी याचिका प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article