महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवालांनी तुरुंगातून चालवावे सरकार! आप’च्या 55 आमदारांनी घेतली सुनीता केजरीवाल यांची भेट

06:29 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आप’च्या 55 आमदारांनी घेतली सुनीता केजरीवाल यांची भेट : राजीनामा न देण्याचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आम आदमी पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी दुपारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. पक्षाच्या आमदारांनी सुनीता केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकरिता एक संदेश दिला आहे. केजरीवालांनी कुठल्याही स्थितीत राजीनामा देऊ नये, तुरुंगातून सरकार चालवावे, असे आमदारांनी म्हटले आहे.

दिल्लीचे दोन कोटी लोक मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पाठिशी आहेत असे या आमदारांनी म्हटले आहे. या बैठकीत ‘आप’च्या 62 आमदारांपैकी 55 आमदार उपस्थित होते. 4 आमदार परगावी आहेत, तर तीन आमदार केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे तुरुंगात आहेत असा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला. अबकारी घोटाळाप्रकरणी तुरुंगात कैद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.

तत्पूर्वी मंगळवारी सकाळी दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेतली होती. एका अत्यंत निकटवर्तीयाच्या माध्यमातून मला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली आहे. स्वत:ची राजकीय कारकीर्द वाचवा किंवा तुरुंगात जाण्यासाठी तयार रहा, असे सांगण्यात आल्याचा दावा मार्लेना यांनी केला आहे.

आगामी काही दिवसांमध्ये माझ्या तसेच माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचे छापे पडणार आहेत, त्यानंतर आम्हा सर्व लोकांना समन्स बजावण्यात येईल आणि काही काळातच आम्हाला अटक केली जाणार आहे. माझ्यासह आप खासदार राघव चड्ढा, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक यांनाही अटक करण्याची तयारी असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.

केजरीवाल यांना अटक झाल्यावर आम आदमी पक्ष कोलमडणार अशी अपेक्षा भाजपची होती. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व तुरुंगात आहे. परंतु रामलीला मैदानातील सभेनंतर ‘आप’च्या चार नेत्यांना अटक करणे पुरेसे नसल्याचे भाजपला वाटू लागले आहे. याचमुळे मला, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांना तुरुंगात डांबले जाणार असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.

भाजपच्या धमक्यांना आम्ही घाबणार नाही असे सांगू इच्छिते. आम्ही आप सैनिक आणि भगत सिंह यांचे अनुयायी आहोत. अखेरच्या श्वासापर्यंत केजरीवाल यांच्यासोबत उभे राहून देशाच्या जनतेच्या कल्याणासाठी काम करत राहणार आहोत ,असे आतिशी यांनी म्हटले आहे.

भाजपकडून प्रत्युत्तर

मार्लेन यांच्या या दाव्यांना भाजप नेते हरीश खुराणा यांनी रचलेली कहाणी ठरविले आहे. नवा दिवस आणि नवी मनोहर कहाणी. भाजपच्यावतीने ज्या व्यक्तीने संपर्क साधला त्याचे नाव आतिशी यांनी जाहीर करावे असे त्यांना माझे आव्हान आहे. भाजपचे शिष्टमंडळ याप्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेत आतिशी विरोधात तक्रार करणार आहे. आरोप करा आणि पळ काढा हे चालणार नसल्याचे भाजप नेत्याने आतिशी यांना सुनावले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article