महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवालांना आता न्यायालयीन कोठडी

06:39 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

14 दिवसांसाठी पुन्हा तिहार कारागृहात रवानगी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता केजरीवाल यांना 12 जुलै रोजी दुपारी 2 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे. केजरीवाल यांच्या तीन दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर सीबीआयने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले. विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी प्रथम केजरीवाल यांना तुऊंगात पाठवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आणि नंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयच्या मागणीवरून दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे सांगण्यात आले. सुनावणीदरम्यान सीबीआयने केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली. केजरीवाल यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान सीबीआयच्या रिमांडच्या मागणीला विरोध करताना सीबीआयला तपासाशी संबंधित गोळा केलेली सामग्री रेकॉर्डवर ठेवण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाच्या आधारे सूचना मागितल्या. त्यांच्या मागणीवर न्यायाधीशांनी हा पैलू न्यायालयावर सोडला पाहिजे असे ठणकावले. तसेच तपासातील महत्त्वाच्या बाबी आरोपींना सांगता येत नाहीत असेही सांगितले. त्यानंतर राऊस एव्हेन्यूच्या विशेष न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुऊंगात रवानगी केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article