केजरीवाल यांनी ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा
बहुचर्चित मद्य धोरणाला दिले आव्हान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या फिर्यादीच्या तक्रारींची दखल घेण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवाल यांनी सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करून कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयाकडून निर्देश मिळविण्याची मागणी केली आहे. यावर आज म्हणजेच 21 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्मयता आहे. या प्रकरणात केजरीवाल सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामिनावर बाहेर आहेत.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्राची दखल घेण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केजरीवाल सध्या अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय या दोन्ही प्रकरणांमध्ये जामिनावर बाहेर आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) म्हणण्यानुसार, मद्य धोरण हे जाणूनबुजून आपच्या नेत्यांना फायदा देण्यासाठी आणि कार्टेल निर्मितीला चालना देण्यासाठी पळवाटा तयार करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, 2022 च्या सुऊवातीला पंजाब आणि गोव्यातील निवडणूक निकालांवर प्रभाव टाकल्याचा आरोप आप नेत्यांवर करण्यात आला आहे.