महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदींच्या पदवीप्रकरणी केजरीवालांना झटका

06:00 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उच्च न्यायालयाकडूनही मिळाला नाही दिलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पदवी प्रकरणी केजरीवाल आणि संजय सिंह यांना न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. उच्च न्यायालयाने मानहानीप्रकरणी दोन्ही नेत्यांच्या विरोधात जारी समन्स रद्द करण्यास नकार दिला आहे.

गुजरात विद्यापीठाने दोन्ही नेत्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाकडून दोन्ही नेत्यांना समन्स जारी करण्यात आला होता. आप नेत्यांनी समन्स विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आप नेत्यांची याचिका फेटाळत न्यायाधीश हसमुख सुथार यांनी सत्र न्यायालयासमोर स्वत:चे म्हणणे मांडण्याचा निर्देश दिला आहे. मागील वर्षी केजरीवाल आणि संजय सिंह या दोघांनाही दंड ठोठावण्यात आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article