For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांना तूर्तास ‘सर्वोच्च’ दिलासा नाही

06:32 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांना तूर्तास ‘सर्वोच्च’ दिलासा नाही
Advertisement

बुधवारी सुनावणी : उच्च न्यायालयाचा निर्णय आज येणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी तातडीने होऊ शकली नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नसल्यामुळे त्यापूर्वी कोणताही आदेश देणे योग्य होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आपल्याला थोडी वाट पहावी लागेल असे सुचवत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी बुधवार, 26 जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाविरोधात ईडीच्या याचिकेवर मंगळवार, 25 जून रोजी उच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. या निर्णयाकडे आम आदमी पक्षासह सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

Advertisement

अरविंद केजरीवाल यांना 20 जून रोजी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयातून जामीन मिळाला होता. तथापि, ईडीने 21 जून रोजी जामिनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्या जामिनाला अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे ते अजूनही तुऊंगातच आहेत. याचदरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

केजरीवाल यांच्या जामिनाच्या मुद्यावर 21 जून रोजी उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत 24-25 जूनपर्यंत निकाल देऊ, असे सांगितले होते. तोपर्यंत जामिनावर स्थगिती राहणार आहे. त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले की, उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवणे असामान्य आहे. सहसा स्थगिती याचिकेतील निर्णय एकाच वेळी दिला जातो. दरम्यान, ईडीने सोमवारी उच्च न्यायालयात उत्तर दाखल करत केजरीवाल यांना राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने दिलेला जामीन बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.