सावंत सरकारवर केजरीवालांनी डागली तोफ
पणजी : गोव्याचे प्रमोद सावंत सरकार हे फक्त हप्ता वसुली सरकार आहे. कारण हप्ता आणि लाच घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही. त्याचे उदाहरण म्हणजे हडफडेची घटना होय. कुठल्याही परवानग्या नसतानाही क्लब सुऊ होता. याचा अर्थ हा क्लब चालवण्यासाठी भाजप सरकारला हप्ता मिळत होता म्हणून हे सरकार हप्ता वसुली सरकार आहे, अशी जळजळीत टीका आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केली. ते शेल्डे येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. आपचे जि.पं. उमेदवार जेम्स फर्नांडिस यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. यावेळी पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, गुंड लोक खुलेआम लोकांना धमक्मया देतात.आमच्या कार्यकर्त्यांनाही धमक्मया देतात.
भाजपला सत्तेतून हटवा
सामान्य गोंयकारांची नोकरी काढून टाकण्याची भाषा करतात. गोवा काय भाजप नेत्यांच्या बापाची जहागीर आहे का? गोवा गोंयकारांचा आहे. गोंयकारांचा आवाज म्हणजे आप आणि आम्ही कुणाला घाबरत नाही. गोमंतकीयांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेतून हटवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.