For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवाल कुटुंबीय वैष्णोदेवी दर्शनाला

06:15 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवाल कुटुंबीय वैष्णोदेवी दर्शनाला
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सोमवारी जम्मूमध्ये वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी आणि समर्थकही दिसले. केजरीवाल सोमवारी कुटुंबीयांसह माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी कटरा येथे पोहोचले. कटरा येथून ते हेलिकॉप्टरने वैष्णोदेवी भवनकडे रवाना झाले. कटरा येथे पोहोचल्यावर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाचे सीईओ अंशुल गर्ग हेही उपस्थित होते. केजरीवाल यांनी सोमवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असल्याची माहिती दिली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करताना आपण पत्नीसह माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.