For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारागृहात परतण्यापूर्वी केजरीवाल भावुक

06:22 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारागृहात परतण्यापूर्वी केजरीवाल भावुक
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मद्य घोटाळा प्रकरणी अंतरिम जामिनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अंतरिम जामिनाची मुदत आता संपत आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना रविवार, 2 जून 2024 रोजी तिहार तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण करावे लागणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला संबोधित केले. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुऊंगात जात असल्याचे ते म्हणाले. ‘नक्कीच, मी तुमच्यामध्ये नसेन, पण तुमचे कोणतेही काम थांबू देणार नाही. माझे कुटुंब म्हणून मी तुमची काळजी घेतली. आता तुम्ही लोक माझ्या वृद्ध आणि आजारी आई-वडिलांची काळजी घ्याल’ अशी आशा मला असल्याचे उद्गार केजरीवाल यांनी काढले. याप्रसंगी ते अतिशय भावुक झाले होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘मी कारागृहात असलो तरी मोहल्ला क्लिनिक, ऊग्णालय, 24 तास वीज, शिक्षण आदींचे काम कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहणार आहे. तुऊंगातून परत आल्यानंतर मी प्रत्येक महिलेला हजार ऊपये देण्यास सुरुंवात करेन.’ तसेच ‘तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून म्हणून मी नेहमीच माझे कर्तव्य पार पाडले आहे. आज मी तुम्हाला माझ्या कुटुंबासाठी काहीतरी मागत आहे. माझे आई-वडील खूप वृद्ध आहेत. माझी आई खूप आजारी राहते. तुऊंगात असताना त्यांची मला खूप काळजी वाटते. त्यामुळे आता तुम्ही त्यांची काळजी घ्यायला हवी’ असेही ते पुढे म्हणाले.

Advertisement

...मी लवकरच परत येईन!

अरविंद केजरीवाल यांनी पत्नी सुनीता यांच्याबाबतही मोठे विधान केले. ‘माझी पत्नी सुनीता खूप खंबीर आहे, तिने आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगी मला साथ दिली आहे. जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येते. आपण सर्व मिळून हुकूमशाहीशी लढत आहोत. मला काहीही झाले, देशाला वाचवताना माझा जीव गेला तरी दु:खी होऊ नका. तुमच्या प्रार्थनेमुळे मी आज जिवंत आहे आणि तुमचे आशीर्वाद भविष्यातही माझे रक्षण करतील. शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमचा हा मुलगा लवकरच परत येईल’ असेही ते पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :

.