महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंतरराष्ट्रीय चित्रपटावरून कीर्ति कुल्हारी उत्साही

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अभिनेत्री कीर्ति कुल्हारीला अभिनयाच्या क्षेत्रात 1 दशकापेक्षा अधिक काळ झाला आहे. स्वत:च्या कारकीर्दीत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याचबरोबर ओटीटीवर ती चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये दिसून आली आहे. कीर्ति आता ‘सच इज लाइफ’ या चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणार आहे. पिंक, फोर मोर शॉट्स प्लीज, क्रिमिनल जस्टिस आणि ह्यूमन यासारख्या प्रोजेक्ट्सनंतर आता कारकीर्दीत पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्यासाठी ही प्रगतीच आहे. ‘सच इज लाइफ’मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्यासोबत कारकीर्दीच्या या टप्प्यात आत्मविश्वास देखील मिळवून देणार असल्याचे कीर्तिने नमूद केले आहे. एक कलाकार म्हणून मी कोणता विचार करते आणि काय करते याचा ‘सच इज लाइफ’ हा एक पुरावा आहे. मी आता व्यापक स्तरावर काम करण्यासाठी तयार आहे. अनेक लोक माझ्या कामाचे मूल्यांकन करणार याची भीती मला वाटत नाही. हा चित्रपट मी करू शकते असे मला वाटते असे तिचे सांगणे आहे. हा चित्रपट मुन्शी परिवाराच्या खऱ्या जीवनाच्या कहाणीवर आधारित असणार आहे. हर्ष महादेश्वर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. एप्रिल महिन्यात याचे चित्रिकरण काश्मीर, नवी दिल्ली, न्यू ऑरलियन्स, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article