कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मानसिक-शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवा!

06:43 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘मन की बात’मधून पंतप्रधानांचा सल्ला : देशवासियांना नववर्षाच्याही शुभेच्छा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातच्या 108 व्या भागात देशाला संबोधित केले. कार्यक्रमात मोदींनी प्रामुख्याने फिट इंडिया मोहिमेवर चर्चा केली. त्याने बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर यांच्याकडून मानसिक आणि शारीरिक आरोग्याविषयीच्या टिप्स ऐकल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याचा मौलिक सल्ला दिला. तसेच शेवटी भगवान श्रीरामाचे भजन सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले. लोकांनी श्रीराम भजन हॅशटॅगसह शेअर केल्यामुळे देशातील सर्व जनता सुखी होईल, असा दावाही केला.

पंतप्रधान मोदींनी फिट इंडिया, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि पोषण यावर दीर्घ चर्चा केली. भारताच्या प्रयत्नांमुळे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. शारीरिक आरोग्याची आवड जसजशी वाढत आहे, तसतशी या क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षकांची मागणीही वाढत आहे. आज, शारीरिक आरोग्य आणि तंदुऊस्तीवर खूप चर्चा केली जाते, परंतु त्याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मानसिक आरोग्य. याचीही तितकीच चर्चा व्हायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले.

2023 मधील काही महत्त्वाच्या घडामोडींवरही पंतप्रधानांनी प्रकाशझोत टाकला. नारी शक्ती वंदन विधेयकही याच वषी मंजूर झाले. नाटो-नाटो या गाण्याला ऑस्कर मिळाला. यंदाही खेळाडूंनी देशाला गौरवाच्या उच्च पातळीवर नेले. चित्रपट क्षेत्रातही अनेक यशोशिखरे गाठली गेली, असे पंतप्रधान म्हणाले. भारत एक इनोव्हेशन हब बनण्याच्यादृष्टीने वाटचाल करत असून त्यात सातत्याने प्रगती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.

‘108’ ची महती विषद

31 डिसेंबर 2023 रोजी मन की बातचा 108 वा भाग सर्वदूर झाला. या भागाची सुरुवात पंतप्रधानांनी 108 क्रमांकाचे महत्त्व सांगून केली. 108 क्रमांकाचे महत्त्व आणि त्याचे पावित्र्य हा सखोल अभ्यासाचा विषय आहे. मंत्राचा जप 108 वेळा केला जातो. बऱ्याच मंदिरांमध्ये 108 पायऱ्या आहेत. त्यामुळे हा भाग माझ्यासाठी अधिक खास झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘मन की बात’चा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला होता. पहिल्या भागाची वेळ मर्यादा 14 मिनिटे होती. जून 2015 मध्ये हे प्रमाण 30 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आले. मन की बात कार्यक्रम 23 भाषा आणि 29 बोलींमध्ये प्रसारित केला जातो.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article