महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजपला सत्तेपासून दूर ठेवा

12:55 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस नेते उत्तम पाटील : प्रियांका जारकीहोळी यांना समर्थन

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन सत्तेत आणणे आवश्यक आहे. यासाठीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (एनपीसी) काँग्रेसला पाठिंबा देण्यात येत आहे. चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन एनपीसी नेते उत्तम पाटील यांनी केले. पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सूचनेवरून लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्यात येत असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले. भाजपकडून नेहमीच जातीचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे हा पक्ष सत्तेवर आल्यास धोका निश्चित आहे. यामुळेच एनपीसी पक्षाकडून चिकोडी मतदारसंघातील उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी अन्नभाग्य, क्षीरभाग्य यासह गृहलक्ष्मी, शक्ती योजना राबवून जनसामान्यांचे सरकार असल्याचे दाखवून दिले आहे. या योजना संपूर्ण देशात चर्चेचा विषय असून इतर राज्यांनीही या योजनांचे अनुकरण चालविले आहे. माजी मुख्यमंत्री देवराज अर्स आणि रामकृष्ण हेगडे यांच्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या चांगले मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस पक्ष नेहमीच गोरगरिबांच्या बाजूने उभे राहिले आहे. यासाठी मतदारांनी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यांची विकासकामे व राज्य सरकारकडून राबविलेल्या गॅरंटी योजनांची जाणिव ठेवून मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा. विद्यमान खासदारांकडून चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यांचे कार्य शून्य आहे. मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी प्रियांका जारकीहोळी यांना समर्थन द्यावे, असे आवाहनही यावेळी उत्तम पाटील यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article