For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदान प्रक्रियेवरील परिणामकारक गोष्टींवर लक्ष ठेवा

12:29 PM Nov 18, 2024 IST | Radhika Patil
मतदान प्रक्रियेवरील परिणामकारक गोष्टींवर  लक्ष ठेवा
Keep an eye on things that affect the voting process
Advertisement

विशेष खर्च निरीक्षक बी.आर.बालकृष्णन यांच्या सूचना : कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणूक खर्च यंत्रणांचा घेतला आढावा

Advertisement

कोल्हापूर : 
मतदानपूर्व 72 तासात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी या काळात वस्तू खरेदी, ऑनलाईन व्यवहार, अवैध मद्य वाहतूक व खरेदी यासह रोख रक्कम वाहतूक याबाबत होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवा, अशा सूचना निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिल्या.

विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी रविवारी कोल्हापुरात निवडणूक अनुषंगिक खर्च यंत्रणांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिह्यातील आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्यांना सादर केला. बालकृष्णन यांनी कोल्हापूरसह सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिह्यांचाही आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. गोव्यातून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीबाबत सिंधुदूर्ग सीमेवरील यंत्रणेने लक्ष ठेवून ती महाराष्ट्रात दाखल होणारच नाही. याची काळजी घ्यावी. तसेच कर्नाटक राज्यातूनही वाहतूक होण्याची शक्यता असल्याने आंतरराज्य सीमांवरील सर्व पथकांनी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश विशेष खर्च निरिक्षक बालकृष्णन यांनी दिले. तसेच अवैध मद्य कोठून आले व कुठे जाणार राज्य व केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागांनी जास्त प्रमाणात वाटप साहित्यांची खरेदी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर जमा होतो. तसेच विविध ठिकाणी अशा वस्तूंचे गोडावून असतात त्या ठिकाणांवर छापे टाकून संशयित बाबींची तपासणी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Advertisement

बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, खर्च निरिक्षक दिनेश कुमार मीना, खर्च निरिक्षक श्रीमती आर. गुलजार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, खर्च नोडल यांच्यासह आयकर विभाग, राज्य व केंद्रीय वस्तू व सेवा कर, लीड बँक, राज्य उत्पादक शुल्क यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सिंधुदूर्ग व रत्नागिरी येथील संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

संशयित ऑनलाईन व्यवहार तपासा
निवडणूक काळात मोठ्या रकमांबरोबरच लहान लहान संख्येने जास्त व्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यास त्याबाबत तपासणी करा. कोणत्याही प्रकारे मतदारांवर परिणाम करणाऱ्या अर्थिक व्यवहार होणारच नाहीत यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करण्याचे निर्देश बालकृष्णन यांनी दिले. रोख रकमांची वाहतूक होत असलेल्या बँकेच्या वाहनामधील ओळख सुविधा बाबत चांगली प्रक्रिया राबवा. याचबरोबर सहकारी बँकांमधील सर्व व्यवहारांवर प्रत्येक तासाला लक्ष ठेवून संशयित प्रकरणांची माहिती इतर विभागांना पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

सी-व्हिजील, 1950 टोल फ्री क्रमांकावरील तक्रारी गांभीर्याने घ्या शेवटच्या काही तासांमधील प्रचारात गैर मार्गाने मतदारांना पैसे किंवा वस्तू वाटपाची तक्रार सी-व्हिजील, 1950 टोल फ्री क्रमांकावर मिळाल्यास गतीने संबंधितावर कार्यवाही करावी. सोशल मीडियावर कोणी चुकीच्या प्रक्रियेचे व्हिडिओ शेअर केले तरी तो संदर्भ घेऊन त्या ठिकाणी भरारी पथक पाठवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Advertisement
Tags :

.