कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माद्रिद मास्टर्समध्ये कास्पर रुड विजेता

06:51 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 

Advertisement

वृत्तसंस्था/ माद्रिद, स्पेन

Advertisement

नॉर्वेच्या कास्पर रुडने येथे झालेल्या माद्रिद ओपन 1000 मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावताना जॅक ड्रेपरचा पराभव केला. 1000 मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळविणारा तो नॉर्वेचा पहिला टेनिसपटू आहे.

माजी जागतिक द्वितीय मानांकित रुडने अंतिम लढतीत 7-5, 3-6, 6-4 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये तो 3-5 असा पिछाडीवर पडला होता. पण त्याने मुसंडी मारत हा सेट जिंकला. दुसरा सेट ड्रेपरने जिंकत बरोबरी साधली तर तिसऱ्या सेटमध्ये 2-2 वर मिळालेल्या एकमेव ब्रेकचा लाभ घेत सेटसह सामना जिंकून जेतेपद निश्चित केले. पहिल्या मॅचपॉईंटवरच त्याने विजय साजरा केला. क्ले कोर्टवरील या विजयानंतर 15 वा मानांकित रुड आता टॉप टेनमध्ये दाखल होईल. ताज्या क्रमवारीत त्याला 7 वे मानांकन मिळणार आहे.

1000 मास्टर्स स्पर्धेत रुडने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. गेल्या वर्षी माँटे कार्लो स्पर्धेत त्याला अंतिम फेरीत सित्सिपसकडून पराभूत व्हावे लागले होते तर 2022 मध्ये मियामी मास्टर्स स्पर्धेत त्याला कार्लोस अल्कारेझने हरविले होते. 2020 पासून क्ले कोर्टवर रुडनेच सर्वाधिक 12 अजिंक्यपदे मिळविली आहेत. ड्रेपरने गेल्या मार्चमध्ये इंडियन वेल्स स्पर्धेत जेतेपद मिळविले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article