कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरची ‘वंदे भारत’ जुलैपर्यंत हाऊसफुल्ल

06:23 AM Jun 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमदये कटरा ते श्रीनगर दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत रेल्वेला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद मिळत आहे. 7 जूनपासून सुरू झालेल्या दोन्ही फेऱ्या 25 जुलैपर्यंत जवळजवळ पूर्णपणे बुकिंग आहेत. तसेच दररोज बुकिंगची मागणी वाढत आहे. आयआरसीटीसीच्या आरक्षण पोर्टलवर 25 जुलैपर्यंत या गाड्यांमध्ये रिक्त जागा दिसतच नाहीत. त्यानंतरच्या तारखांना काही जागा दिसत असल्या तरी त्यांचे आरक्षणही वेगाने केले जात आहे. या गाड्यांमुळे खोऱ्यात प्रवास करण्याचा एक नवीन पर्याय मिळाल्यामुळे पर्यटक आणि व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. विमानाच्या तुलनेत कमी तिकीट दरामुळे पर्यटकांकडून वंदे भारतमधून प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदींनी 6 जून रोजी वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेसची तिकिटे आयआरसीटीसी वेबसाईटवरून बुक करता येतात. ट्रेनमध्ये दोन प्रवासी कक्ष आहेत. चेअर कारचे भाडे 715 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 1,320 रुपये आहे. कटरा आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून 6 दिवस दोन गाड्या धावतात. या गाड्या सध्या फक्त बनिहाल येथे थांबा घेत असून इतर थांब्यांचा निर्णय अजून झालेला नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article