महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काश्मिरी तरुणाकडून पाकिस्तानसाठी हेरगिरी?

06:40 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संशयिताला ओडिशामधून अटक : पीएमओ अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) जाजपूर जिल्ह्यातून एका काश्मिरी तरुणाला (37) अटक केली आहे. तो कधी पीएमओ अधिकारी, आर्मी डॉक्टर, न्यूरो सर्जन तर कधी एनआयए अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सय्यद इशान बुखारी ऊर्फ डॉ. इशान बुखारी असे या तऊणाचे नाव आहे. तो काश्मीरमधील कुपवाडा येथील रहिवासी असून 2018 पासून ओडिशात राहत होता. त्याने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशयही व्यक्त केला जात असून त्याची सखोल चौकशी तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

इशान बुखारी याने आपली ओळख बदलली आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशासह भारतातील अनेक राज्यांमध्ये सुमारे सहा-सात मुलींशी लग्न केल्याचाही दावा केला जात आहे. तो अनेक डेटिंग अॅप्स आणि वेबसाईटवरही सक्रिय होता. आरोपीचे अनेक मुलींसोबतही संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो पाकिस्तानातील अनेक संशयित लोकांच्या संपर्कात असल्यामुळे तो पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणांना त्याच्याविऊद्ध अनेक सबळ पुरावेही सापडले आहेत. फसवणूक आणि बनावटगिरीच्या गुन्ह्यात तो काश्मीर पोलिसांना हवा असलेला गुन्हेगार आहे. त्याच्याविऊद्ध अजामीनपात्र वॉरंट प्रलंबित आहे.

अटक करण्यात आलेल्या काश्मिरी तऊणाकडे अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या वैद्यकीय पदव्या आहेत. या पदव्यांच्या आधारावर तो लोकांची फसवणूक करत असे. त्याच्याकडून अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, पॅनडाच्या आरोग्य सेवा संस्था आणि इतर विद्यापीठांनी जारी केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे व पदव्या जप्त करण्यात आल्याचे ओडिशा एसटीएफचे आयजी जय नारायण पंकज यांनी सांगितले.

4 मोबाईल फोनसह अनेक कागदपत्रे जप्त

पदवी प्रमाणपत्रांशिवाय चार मोबाईल फोन, अनेक ओळखपत्र, कोरे धनादेश, व्हिजिटिंग कार्ड, स्वाक्षरी केलेली कोरी शपथपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. आरोपीच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या चॅट्स आणि लिंक्सची तपासली जात आहे. आम्हाला ईशान बुखारीविऊद्ध फसवणुकीचे पुरेसे पुरावे मिळाले असल्याचे पंकज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article