महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कसबा बावड्यात ‘काँग्रेस‘च बळकट ! राज्यातील सत्ता बदलाचा बावड्यातही परिणाम;

11:56 AM Apr 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
Kasba Bawda National Congress Kolhapur
Advertisement

शिवसेना व राष्ट्रवादीच्या मतांची झाली विभागणी

सचिन बरगे कसबा बावडा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावडा, लाईन बाजार या उपनगरात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. काँग्रेसचे सर्वेसर्वा आमदार सतेज पाटील कसबा बावड्यातील रहिवासी असून आमदार पाटील यांनी व्यक्तिगत संबंध ठेवल्यामुळे बावड्यात त्यांचे वेगळे वलय आहे. आमदार सतेज पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने पर्यायाने बावड्यात काँग्रेस बळकट असल्याचे दिसून येते. कोणतीही निवडणूक असो, गठ्ठा मतदानामुळे कसबा बावडा कायम चर्चेत असतोच. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे याच बावड्याचे सुपुत्र असल्यामुळे येथे त्यांचा आदरयुक्त दबाव आहे.

Advertisement

आमदार पाटील यांची राजकीय कारकीर्द 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सुरू झाली. त्यांनी तत्कालीन सार्वजनिक आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेत काँग्रेसशी जोडलेली नाळ आजतागायत टिकून आहे. कसबा बावड्यात पक्षापेक्षा व्यक्ती कोण, यावर मतदारांचा कल असतो. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यात आमदार सतेज पाटील यांच्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व आहे. दरम्यान, बावड्यात काँग्रेस, शिवसेना आणि भाजप कार्यरत आहे. राज्यातील राजकीय घडामोडीमुळे शिवसेना व राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने मतदारांमध्ये विभागणी झाली आहे.

Advertisement

बावड्यातील भगवा चौकात नियोजित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केले. या पुतळ्यासाठी येणारा खर्च डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप करेल, अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी करून शिवभक्तांची मने जिंकली. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होण्यासाठी आमदार पाटील प्रयत्नशील राहतील, हे नक्की. दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादीतील उभ्या फुटीमुळे बावड्यात आमदार पाटील यांच्या काँग्रेसची मत्तेदारी पुन्हा एकदा घट्ट होणार आहे.

हे कोल्हापूर हाय, इथं फक्त बंटी ची गॅरंटी चालते !
लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी सोशल मीडियामार्फत प्रचार सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील यांनी आघाडी घेतली आहे. एकीकडे ‘मोदी की गॅरंटी‘ ही भाजपची टॅगलाईन व्हायरल करत प्रचार सुऊ झाला आहे. दुसरीकडे हाच धागा पकडून विरोधकांनीही कसबा बावड्यात ‘हे कोल्हापूर हाय, इथं फक्त ‘बंटी‘ची गॅरंटी चालते‘ असे अनेक मोबाईलच्या स्टेटसला लावल्याचे दिसत आहेत.

दरम्यान, कसबा बावडा-लाईन बाजार परिसरात महापालिकेचे सहा प्रभाग असून येथे 27 हजार मतदार आहेत. काँग्रेसचे वर्चस्व आहे. दरम्यान, 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर राजेश क्षीरसागर निवडून आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदारसंघात शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर, भाजपकडून महेश जाधव, राष्ट्रवादीकडून आर. के. पोवार व काँग्रेसकडून सत्यजित कदम अशी चौरंगी लढत झाली. यामध्ये शिवसेनेचे क्षीरसागर विजयी झाले. क्षीरसागरांच्या विजयासाठी कसबा बावड्यातील मतदान निर्णायक ठरले. राजेश क्षीरसागर यांचाही कट्टर गट कसबा बावड्यात दिसून येतो.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथून काँग्रेसमधून दिवंगत माजी आमदार चंद्रकांत जाधव व शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात दुरंगी लढत झाली. यामध्ये जाधव यांनी 15 हजार 199 इतके मताधिक्य घेऊन आमदार झाले. यावेळी बावड्यातून क्षीरसागर यांना 6 हजार 338 तर जाधव यांना 13 हजार 293 मते मिळाली. आमदार सतेज पाटील यांच्यामुळे जाधव यांना मिळालेले बावड्यातील गठ्ठा मतदान निर्णायक ठरले. त्यानंतर आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली. यात चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव विजयी झाल्या. पण कसबा बावड्यातून गतनिवडणुकीपेक्षा 3 टक्के अधिकचे मतदान विरोधकांनी घेतल्याचे समोर आले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक व भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात लढत झाली. आघाडी धर्माला तिलांजली देत आमदार सतेज पाटील यांनी राजकीय वैरत्व समोर ठेवून ‘आमचं ठरलंय‘ टॅगलाईनवर अप्रत्यक्षरीत्या भाजप शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा देत बावड्यातून 7 हजार 500 चे मताधिक्य दिले. कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गेली 28 वर्षे सत्ता आहे. त्यामुळे कसबा बावड्यात महाडिक गटही सक्रिय आहे.

Advertisement
Tags :
kasba bawdaLine BazarLok Sabha ConstituencyNational Congress
Next Article