कारवार जिल्ह्यातील बारावी परीक्षेचा निकाल 81.93 टक्के
कारवार : कारवार जिल्ह्यातील बारावी परीक्षेचा निकाल 81.93 इतका लागला आहे. जिल्हावार निकालाबाबत कारवार जिल्ह्याला यावर्षी सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. गेल्यावर्षी कारवार जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकाविला होता आणि टक्केवारी 92.51 इतकी होती. जिल्ह्यातील एकूण 12 हजार पाच विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 10785 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला विभागातील निकाल 73.78, वाणिज्य विभागाचा 82.89 टक्के इतर विज्ञान विभागाचा निकाल 88.89 टक्के इतका लागला आहे. कला विभागातून 8059 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 2257 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य विभागातून 5213 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4321 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान विभागातून 4737 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 4207 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला विभागातून येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या दीपक नाईकने 600 पैकी 587 (97.83) गुण मिळवून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. वाणिज्यमधून शिरसी तालुक्यातील यडहळ्ळीतील विद्यालय पदवीपूर्व महाविद्यालयाचा विद्यार्थी दर्शन हेगडेने 600 पैकी 595 (99.16) टक्के गुण मिळवून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविला आहे. विज्ञान विभागात कुमठा येथील सरस्वती पदवीपूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या के. भागवतने 600 पैकी 594 (99) टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आली आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे अपसंचालक राजप्पा के. एच. यांनी दिली आहे.