कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

करुण नायर, स्मरण यांची द्विशतके

06:08 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ थिरुवनंतपुरम

Advertisement

रणजी क्रिकेट स्पर्धेतील ब इलाईट गटातील सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटकाने पहिल्या डाव 5 बाद 586 धावांवर घोषित केला. कर्नाटक संघातील करुण नायर आणि रविचंद्रन स्मरण यांनी दमदार द्विशतके झळकाविली.

Advertisement

केरळ विरुद्ध सुरु असलेल्या या सामन्यात दिवसअखेर केरळने पहिल्या डावात 3 बाद 21 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या पहिल्या डावात करुण नायरने 389 चेंडूत 2 षटकार आणि 25 चौकारांसह 233 तर स्मरणने 390 चेंडूत 3 षटकार आणि 16 चौकारांसह नाबाद 220 धावा झळकाविल्या. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी विक्रमी 343 धावांची त्रिशतकी भागिदारी केली. स्मरणचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले द्विशतक आहे. कर्नाटकाने 167 षटकात 5 बाद 586 धावांवर डावाची घोषणा केली.केरळच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. कर्नाटक संघातील वेगवान गोलंदाज कवीरप्पा आणि विजयकुमार यांनी केरळचे 3 गडी बाद केले. 10 षटकाअखेर केरळने 3 बाद 21 धावा जमविल्या. कवीरप्पाने 7 धावांत 2 गडी बाद केले. केरळचा संघ आता 565 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळायचे आहेत. या सामन्यात केरळ आणि कर्नाटक या दोन्ही संघांना आपल्या पुढील वाटचालीसाठी निर्णायक विजयाची गरज आहे.

नाशिक येथे सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील अन्य एका सामन्यात शनिवारचा पहिला दिवस पूर्णपणे पावसाने वाया गेल्यानंतर रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी केवळ 12 षटकांचा खेळ झाला आणि सौराष्ट्रने 1 बाद 61 धावा पहिल्या डावात जमविल्या.

संक्षिप्त धावफलक : कर्नाटक प. डाव 5 बाद 586 (करुण नायर 233, स्मरण नाबाद 220, श्रीजित 65), केरळ प. डाव 10 षटकात 3 बाद 21 (कवीरप्पा 2-7,

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article