Miraj : मिरजेतून कार्तिक दिंडीचे प्रस्थान, वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ
मिरज शहरातून कार्तिक दिंडीचे उत्साहपूर्ण प्रस्थान
मिरज : शहरातील शहरातील वारकरी संप्रदायातील भाविकांमार्फत आयोजित कार्तिक दिंडीचे प्रस्थान नुकतेच झाले. ही दिंडी वेगवेगळे मुक्काम करीत पंढरपूरला पोहोचणार आहे. मिरज शहरातील विठ्ठल भक्तांच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीनंतर कार्तिक वारीचे आयोजन करण्यात येते.
यामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वारकरी सांप्रदायिक सहभागी होतात. शहरातील ही एक प्रमुख दिंडी आहे. या दिंडीचे प्रस्थान नुकतेच झाले. यावेळी दिंडीच्या स्वागतासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंढरपूर रोडवरील अजित पोतदार यांच्या फार्म हाऊसवर या दिंडीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी अजित पोतदार यांच्यासह डॉ. विनोद परमशेट्टी, बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन, डॉ. व्हावळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित पोतदार व मित्र मंडळाच्यावतीने वारकऱ्यांना नाश्ता देण्यात आला.
सदरची वारीही वेगवेगळे मुक्काम करीत तीन दिवसांनी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या दिंडीचे नेतृत्व ऋषिकेश बोडस यांच्यासह अन्य वारकरी करीत आहेत. पोतदार मळा येथे वारकऱ्यांनी अभंग आणि ओव्यांचे सादरीकरण केले. त्यांच्यासोबत अन्य नागरिकांनीही टाळ मृदुंगाच्या गजरात ताल धरला. विठ्ठल नामाचा जयघोष करीत ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.