For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेजच्या मैदानात कार्तिक काटेची बाजी

09:56 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेजच्या मैदानात कार्तिक काटेची बाजी
Advertisement

श्री काडसिद्धेश्वर यात्रेनिमित्त कुस्ती मैदानात कुस्ती शौकिनांची गर्दी : दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत

Advertisement

वार्ताहर /बेडकिहाळ

नेज (ता. चिकोडी) येथील ग्राम दैवत श्री काडसिद्धेश्वर देवाच्या  वार्षिक यात्रेनिमित्त 11 रोजी दुपारी 4 वाजता भव्य निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मैदान कर्नाटक डबल केसरी मल्ल कार्तिक काटे  यांनी हरियाणाच्या  मल्ल. सुमितकुमार   याला   एकचाट  डावावर चितपट करून पहिल्या क्रमांकाचे चांदीच्या गदाचे मानकरी ठरला. सदर कुस्ती 5 मिनिट 1 सेकंदात  संपल्याने कुस्ती शौकीनांनी एकच जल्लोष केला. या सामन्याचे बबन दानोळे व पंच अखिल भारतीय कुस्ती कमिटीचे चिकोडी तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मण निंबाळकर यांनी काम पहिले. प्रारंभी श्री काडसिद्धेश्वर यात्रा व कुस्ती कमिटी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत अजियशिंग शितोळे सरकार, ग्राम पंचायत सदस्य शकीर बेग, पीकेपीएस अध्यक्ष   राजू पाटील, व यांच्या हस्ते मैदान पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. तर मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उदघाटनाची कुस्ती श्रेयश कुढाळकर व कार्तिक हेगडे यांच्यात लावण्यात आली होती. या मध्ये यश चव्हाण श्रेयश कुढाळकर हा विजयी ठरला. यावेळी दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मल्ल. प्रकाश इंगळगी व मल्ल नारायण सोलंकार  यांच्यात झाली. ही कुस्ती अतितटीची झाल्याने सामना बरोबरीत सोडविण्यात आला. पंच म्हणून बबन दानोळे यांनी काम पहिले.

Advertisement

तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती मल्ल संजू इंगळगी विरुद्ध मल्ल मनोज गावडे यांच्यात लागली. त्यामध्ये संजू इंगळगी हा डंकी डावावर विजय झाला. पंच म्हणून दगडू चिंचणे यांनी काम पहिले. चौथ्या क्रमांकाची कुस्ती मल्ल संतोष हारुगेरी व मल्ल किरण पाटील यांच्यात लागली. त्यात मल्ल संतोष हारुगेरी यांनी एकल डावावर विजय मिळविला. पंच म्हणून बबन दानोळे यांनी काम पहिले. यासह पाचवी कुस्ती मल्ल साताप्पा हारुगेरी व मल्ल हर्षद दानोळे यांच्यात झाली. तो सामना बरोबरीत झाला. पंच म्हणून बसू घोडगेरी यांनी काम पहिले.  सहाव्या क्रमांक कुस्ती मल्ल पृथ्वीराज खरात विरुद्ध मल्ल पवन चिक्कद्दीनीकोप्प यांच्यात झाली. ही कुस्ती देखील बरोबरीत सोडविण्यात आली. तर सातव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल अमित कांबळे व मल्ल बाळू शिंदीकुरबेट यांच्यात झाली. त्यात बाळू शिंदीकुरबेट याने विजय मिळविला. आठव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल प्रताप पाटील विरुद्ध मल्ल रुद्राप्पा धारवाड यांच्यात झाली. ही कुस्ती देखील बरोबरीत सोडविण्यात आली. नवव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल हनुमंत घटप्रभा व मल्ल लक्ष्मण जाधव यांच्यात झाली. त्यामध्ये मल्ल हनुमंत घटप्रभा यांनी बाजी मारली.जाहिरातीच्या ब्लॉकवरील कुस्त्या मल्ल अल्लाबक्ष इंगळगी, गजानन निर्वाणी, कार्तिक इंगळगी, निलेश मोहिते, अर्जुन तळंदगे, प्रदीप जमादार, शुभम पाटील, निरंजन माळी, असिफ सुलतानपूर, यांच्यासह कर्नाटक-महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा निकाली कुस्त्या झाल्या. यावेळी बेडकिहाळ, नेज, नागझरी, खडकलाट, जैनापूर, दत्तवाड, मांगूर, कुस्ती कमिटी, काड सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, ग्रा पं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, कुस्ती वस्ताद, कुस्तीशौकीन, ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.