महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कार्तिक काकडा.....

06:26 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन कृष्णा हालकारे घडीये घडीये घडीये घडिये बोल कारे,.......उभा राहुनिया कैसा हालवितो बाहो..हाल कारे कृष्णा डोल कारे.....’

Advertisement

खरंतर सकाळी जाग आल्यावर आम्ही ‘कराग्रे वसते लक्ष्मी..’ असं म्हणून लक्ष्मीची आराधना करत असतो. पण मनातल्या मनात या विश्वाचा पसारा मोजत असतो. काकड्याचा हा अभंग ऐकला की त्या सृष्टीच्या निर्मात्याला खरंतर आपण वंदन करत असतो, असा भास होतो. चंद्र, सूर्य, तारे, ग्रह, आकाशगंगा हे सगळे जाणून निर्माण केलं त्यालाच उठवायचा हा सोहळा. ज्याच्यामुळे चंद्रप्रकाश तो, सूर्यप्रकाश तो अशा या सूर्यालासुद्धा ज्यांनी योग सांगितलेला आहे त्या कृष्णाची ही काकडआरती. खरंतर हे सारं विश्व त्या कृष्णाच्या तालावरच नाचत असतं आणि म्हणूनच त्याचं कौतुक करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्यच असतं. हे सगळं पाहिलं की त्याची महती नेमकी पुढच्या गीतातून आपल्यासमोर येते.

Advertisement

‘कोटी कोटी रुपये तुझी कोटी चंद्र सूर्य तारे

कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे ...’

अशी अवस्था तुमच्या आमच्या सामान्य माणसाची होत असेल, तर संतांना वेगळीच अनुभूती यातून येत असते. एकदा गुरुदेव रानडे आळंदीला माऊलीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्याकाळी वाहतुकीची साधनं कमी असल्यामुळे टांगा किंवा घोडागाडी करायला लागायची किंवा घोड्यावरुन प्रवास करायला लागायचा. या घोडा गाडीत बसल्यानंतर गुरुदेवांच्या बरोबर असलेले भक्त काहीतरी गुणगुणत होते. गुरुदेवांनी त्यांना हा वरचा अभंग म्हणायला सांगितला आणि डोळे मिटून ते शांतपणे ऐकू लागले. अभंग केव्हाच संपला तरी ते ज्या भाव समाधीत गेले होते ती भाव समाधी थेट आळंदीला गेल्यानंतरच उतरली. याचा अर्थ असा आहे की साऱ्या चराचरात, विश्वात तोच भरून राहिलाय याचीच अनुभूती गुरुदेव डोळे मिटून घेत होते. तुम्ही आम्हीसुद्धा ती घेऊ शकतो किंवा आपल्यालाही घेता आली पाहिजे. अशा या प्रात:काळी म्हंटले जाणारे काकड्याचे अभंग खरंतर देवाच्या ऐवजी आम्हाला जागे करत असतात. आमच्या अंतकरणाला साद घालत असतात. या चराचराला चालवणाऱ्या कृष्णाला आम्ही डोलवत असतो, हलवत असतो, जोजावत असतो आणि लोणी साखरसुद्धा भरवत असतो. असा हा काकड्याचा सोहळा प्रात:काळी सुरू झाला की साऱ्या चराचरात चैतन्य भरून राहतं.

माणसांना मात्र काकडा उरकून कधी घर गाठतो, कधी व्यापार धंदा करतो, असं झालेलं असतं. खरं तर माणूस जन्मापासूनच काळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतोच. पण जन्माबरोबरच जन्माला आलेला मृत्यू या काळाच्या कित्येक पावलं पुढे जाऊन उभा राहिलेला असतोच, हे मात्र आमच्या कधीच लक्षात येत नाही. कारण ह्या कालाच्या पावलांचा आवाज कधीच येत नसतो आणि त्याची जाणीवही तो आपल्याला होऊ देत नाही. म्हणूनच अशा या काळाला संमुख जाताना आम्ही देवाच्या सानिध्यात राहिले पाहिजे. देवाची काकड आरती करून अगदी शेजारतीपर्यंत त्याच्यासमोरच प्रत्येक कर्म त्याला वाहून उभे राहिले पाहिजे. अशा वेळेला आपण डोळे मिटून उभे असतो आणि तो मात्र स्वत: डोळे उघडे ठेवून उभा असतोच. जागं करायची गरज आपल्यासारख्यांना असते. देवाला नाही कारण या देवांनासुद्धा आपली म्हणजे भक्ताची ओढ लागलेली असते. आणि म्हणूनच तो सतत हात हलवून आम्हाला त्याच्याजवळ त्याच्या सानिध्यात बोलवत असतो. परंतु आम्ही मात्र संसाराची कारणं पुढे करून या काकड्यातूनसुद्धा पळ काढतो आणि घर गाठतो.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article