For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकाचा त्रिपुरावर विजय

06:22 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकाचा त्रिपुरावर विजय
Advertisement

वृत्तसंस्था / इंदोर

Advertisement

2024 च्या सय्यद मुस्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्नाटकाने त्रिपुराचा 3 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी पराभव केला.

या सामन्यात कर्नाटकाने नाणेफेक जिंकून त्रिपुला प्रथम फलंदाजी दिली. त्रिपुराने 20 षटकात 5 बाद 185 धावा जमविल्या. त्यानंतर कर्नाटकाने 19.3 षटकात 5 बाद 191 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला.

Advertisement

त्रिपुराच्या डावामध्ये सलामीच्या सम्राट सुत्रधारने 36 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 55, कर्णधार मनदीप सिंगने 41 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 68, मणिशंकर मुरासिंगने 21 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावा जमविल्या. शरतने 9 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 11 धावा केल्या. त्रिपुराला 17 अवांतर धावा मिळविल्या. कर्नाटकातर्फे कौशिक, विद्याधर पाटील, श्रेयस गोपाल आणि मनोज भांडगे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर कर्नाटकाच्या डावात कर्णधार मयांक अगरवालने 31 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 51, कृष्णन श्रीजितने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16, आर. सीमरनने 31 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 57, अभिनव मनोहरने 16 चेंडूत 4 षटकारांसह नाबाद 34 तर शुभांग हेगडेने 9 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 20 धावा झळकविल्या. कर्नाटकाच्या डावात 12 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. त्रिपुरातर्फे अभिजित सरकारने 2 तर सौरभ दास आणि अजय सरकारने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: त्रिपुरा 20 षटकात 5 बाद 185, कर्नाटक 19.3 षटकात 5 बाद 191

Advertisement
Tags :

.