Karnataka : दलित विद्यार्थ्यांकडून केली सेप्टिक टाकी साफ ! व्हायरल व्हिडीओनंतर प्राचार्यासह कर्मचाऱ्यांना अटक
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील यलुवहल्ली, मलूर तालुक्यातील मोरारजी देसाई निवासी शाळेत शौचालयासाठी वापरण्यात येत असलेली सेप्टिक टाकी अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्याकडून साफ करत असल्याचा व्हिडीओ बाहेर आल्यानंतर कर्नाटक प्रशासनाने तात्काळ कारवाई करत शाळेच्या प्राध्यापकासह कर्मचारी वर्गाला अटक केली आहे.
शाळेतीलच एका शिक्षकाने आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये, इयत्ता 7 वी ते 9 वी मधील विद्यार्थी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली सेप्टिक टँकमध्ये उतरत असून आणि काही विद्यार्थी साफ करताना दिसत आहेत.
या व्हिडीयोमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेत चुकिची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करून रात्री वसतिगृहाबाहेर गुडघे टेकणे आणि शारीरिक शोषणाचा आरोप व्हिडिओमध्ये केला गेला आहे. तर शाळेच्या प्राचार्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी हा स्वच्छता मोहिमेचाच एक भाग असल्याचा दावा करून या घटनेला फारसे महत्व कमी नसल्याचा दावा केला आहे.
तर दुसर्या एका व्हिडिओमध्ये, विद्यार्थी आपपल्या पाठीवर बॅगा घेऊन गुडघे टेकून हात वर करताना दिसत आहेत. तर एक मुलगा श्वास घेत असताना त्याचे मित्र त्याला पाणी पिण्यास मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
सुमारे तीन दशकांपूर्वी भारतात हाताने मानवी मैला साफ करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, परंतु ही काही ठिकाणी या प्रथा सुरूच आहेत, त्यामुळे दरवर्षी अनेक मृत्यू होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाकीमध्ये गुदमरल्यामुळे मृत्युचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात आहेत.
धक्कादायक दृश्यांमुळे संताप व्यक्त करण्यात येत असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीने हस्तक्षेप केला. शाळेच्या प्राचार्या भरतम्मा आणि शिक्षक मुनियप्पा यांना अटक करण्यात आली असून निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून त्यांना कामावरून निलंबितही करण्यात आले आहे.