कर्नाटक दहावी व बारावी वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
बेंगळुरू : मार्च १ ते २२ दरम्यान बारावीच्या परीक्षा तर मार्च २५ ते एप्रिल ०६ दरम्यान दहावीच्या वार्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती शाळा शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी दिली आहे.
आज विकाससौध येथे बोलाविण्यात आलेल्या सयुंक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदा ८,९६,२७१ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी २,७४१ परीक्षा केंद्रे तयार करण्यात आले आहेत. तसेच ६,९८,६२४ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील घेण्यात आलेल्या तिन्ही परीक्षेतील कमाल गुणाची परिगणना यावेळी करण्यात येईल. मात्र या परीक्षा सक्तीचे नसून, कोणत्याही एका परीक्षेत मिळविलेल्या कमाल गुणाची परिगणना यावेळी करण्यात येईल.
२०२३-२४ सालची बारावीची परीक्षा ही ८० प्लस २० अशी घेण्यात येईल. ८० गुणांसाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागेल तर २० गुण मूल्यमापना च्या आधारे दिले जाणार आहेत. तसेच बारावी आणि दहावीची पूरक परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येईल असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.