कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट नोव्हेंबरात
बेळगाव : राज्यात प्रत्येक जिह्याने एक संघ बनविला असून, बेळगांव जिह्याचाही संघ तयार झाला असून बेळगांव जिह्याच्या संघाचे प्रायोजक डॉ अंजलीताई फांऊडेशनचा संघ राजा शिवाजी बेळगाव असे असून या स्पर्धा 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या काळात बेंगलोर येथे खेळविल्या जाणार आहेत. राजा शिवाजी बेळगाव संघाच्या लोगोचे अनावरण व या स्पर्धेच्या आयोजनाची माहिती आज बेळगांव येथे पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्य सॉफ्ट बॉल संघटनेचे अध्यक्ष गंगाधर राजू यांनी सर्व माहिती दिली.
या पत्रकार परिषदेस डॉ अंजलीताई फांऊडेशनचे सुरेश जाधव, मिलींद भाऊ, बेनी पिंटो, नगरसेवक तोहीद चांदखन्नावर, संदीप देसाई तसेच क्रिकेट संघाचे सदस्य, खेळाडू उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष गंगाधर राजू यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक खेळाडूस गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
गंगाधर राजू म्हणाले सर्वानाच राज्याच्या, देशाच्या संघामध्ये आयपीएल खेळायला मिळत नाही. गल्ली क्रिकेट मध्ये अनेक होतकरू खेळाडू आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याचे आयपीएल चा धर्तीवर सगळे नियोजन करण्यात आले असून खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सुद्धा मागेच पार पडली असून खेळाडूंची निवड प्रक्रिया सुद्धा पार पडली असल्याचे सांगण्यात आले. उपस्थित सर्वानी आपल्या जिह्याच्या संघाला शुभेच्छा दिल्या.