For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karnataka News : नोकरीवरून काढल्याने शासकिय महिला अधिकाऱ्याची हत्या; बेंगळूर मधील धक्कादायक प्रकार

01:08 PM Nov 06, 2023 IST | Abhijeet Khandekar
karnataka news   नोकरीवरून काढल्याने शासकिय महिला अधिकाऱ्याची हत्या  बेंगळूर मधील धक्कादायक प्रकार
Advertisement

कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून बंगळूर मधील एका कंत्राटी कामगाराने एका सरकारी महीला अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. के.एस.प्रतिमा असे नाव असलेल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येने एकच खऴबफळ माजली असून पोलीसांनी तात्काळ आरोपीला चामनगर जिल्ह्यातून अटक केली आहे.

Advertisement

याबद्दलची अधिक माहीती सांगताना बेंगळूरचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी, " के. एस. प्रतिमा कर्नाटक शासनाच्या सेवेत होत्या. त्यांनी कंत्राटी कर्मचारी असलेल्या किरणला सेवेतून बडतर्फ केले होते. तो के.ए. प्रतिमा यांच्यासाठी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. 7 ते 10 दिवसांपूर्वी कामावरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. या गोष्टीचा के.एस.प्रतिमा यांच्यावर राग होता. त्यानंतर त्याने बेंगळूरमधील तिच्या राहत्या महिला अधिकाऱ्याच्या घरी जाऊन निर्घृण हत्या केली. घटनेनंतर तो कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यात पळून गेला. पोलिसांना ठावठिकाणा लागल्यावर चामनगरमधील माले महाडेश्वरा हिल्सवरून त्याला अटक करण्यात आली."असे म्हटले आहे.

के. एस. प्रतिमा ह्या एक अतिशय हुशार आणि खूप धाडसी महिला अधिकारी होत्या. विविध ठिकाणी छापे असोत किंवा कोणतीही धडक कारवाई यामध्ये त्यांनी आपल्या विभागात मोठा नावलौकिक मिळवला होता. तिच्या हत्येमुळे शासकिय अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.