For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान संघ विजयी

10:19 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक  महाराष्ट्र  मध्यप्रदेश  राजस्थान संघ विजयी
Advertisement

ज्युनियर राष्ट्रीय मुलींची फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल सामन्यातून कर्नाटकाने चंदीगडचा, उत्तरप्रदेशने जम्मूकाश्मिरचा, राजस्थानने त्रिपुराचा तर महाराष्ट्राने पुदुचेरीचा पराभव करुन विजयी सलामी दिली. बेळगाव येथील ट्रर्फ मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव पोलीस आयुक्त एडा मार्टिन मार्बलिंग, अमान सेठ, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, प्रशांत देवदानम, अल्लाबक्ष बेपारी, आदी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करुन व चेंडू लाथाडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत संपूर्ण भारतातून नामवंत 18 संघांनी भाग घेतला आहे.सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कर्नाटक संघाने  चंदीगड संघाचा 11-0 असा पराभव केला. या सामन्यात कर्नाटकाच्या मैत्रेई पलासमुद्रमने सलग 5 गोल करुन स्पर्धेची पहिली हॅट्ट्रीक नोंदविली.

मेधा गुप्ताने 2 तर रिना जोकब, अद्विका कानोजी, अनिका श्रीवास्तव, एच. आशिका यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात उत्तरप्रदेश संघाने जम्मूकाश्मिर संघाचा 15-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात कुमारी कोमलने 4, अंचल पटेलने 3, शोभनाने 3, खुशी राय व सरिता यांनी प्रत्येकी 2 तर ऋतिकाने 1 गोल केला. तिसऱ्या सामन्यात राजस्थानने त्रिपुराचा 8-0 असा पराभव केला. या सामन्यात राजस्थानतर्फे संजु कणवार, मंजू कणवार, भानू प्रिया यांनी प्रत्येकी 2 गोल तर सुमन कणवार, लिचमी कणवार यांनी प्रत्येकी 1 गोल केला. चौथ्या सामन्यात गतविजेता महाराष्ट्र संघाने पुदुचेरीचा 9-1 असा पराभव केला. या सामन्यात आदित्यी धेरे, श्रेया मोरे यांनी प्रत्येकी 2 तर हर्लिन कौर शोकी, गौरी गुरव, आलिशा मेहता, सानिया इराणी यांनी प्रत्येकी 1 तर पुदुचेरीच्या खेळाडूने 1 गोल नोंदविला.

Advertisement

Advertisement
Tags :

.