महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

Karnataka : कर्नाटकचा निकाल हा आमच्यासाठी इशारा...! लोकसभा निकालांवर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया

06:44 PM Jun 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
DK Shivakumar
Advertisement

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल हा काँग्रेस पक्षासाठी संदेश असल्याचं म्हटलं आहे. तसेच या निकालानंतर राज्य काँग्रेस पक्ष नक्कीच आत्मपरीक्षण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

Advertisement

लोकसभेच्या निकालानंतर कर्नाटक राज्यातमध्ये काँग्रेसची सत्ता असताना पक्षाला चांगल्या निकालाची अपेक्षा होती. पण काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्यने राज्यासह केंद्रातील अनेक नेत्यांचा भ्रमनिरास झाला. या संदर्भात आज प्रेस काँन्फरन्स मध्ये बोलताना डी. के. शिवकुमार यांनी यावर भाष्य केले आहे.

Advertisement

ते म्हणाले, "राज्यामध्ये आम्हाला किमान २५ पैकी १५ जागांची अपेक्षा होती, पण आम्हाला फक्त ९ जागा मिळाल्या. आम्ही बेंगळुरू ग्रामीण हरलो हा आमच्यासाठी संदेश आहे. २०१८ च्या निवडणुकीत एका जागेच्या तुलनेत आम्हाला ९ जागा मिळाल्या यावरदेखिल नजर टाकणे महत्त्वाचे आहे. येत्या काळात आम्ही या सर्व गोष्टींची आत्मपरिक्षण करू.” असा विश्वासही त्यांनी दाखवला.

पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही टिका केली. देशात मोदी लाट नसल्याचा पुनर्ऊच्चार करताना शिवकुमार यांनी, “भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना ४०० जागा मिळाल्या नाहीत. भाजपला २५० जागाही मिळवता आल्या नाहीत त्यामुळे या देशात मोदी लाट नसल्याचं सिद्ध होत आहे. आता तर त्यांनी अयोध्याची जागाही गमावली आहे,”असा खुलासाही त्यांनी केला.

बेंगळुरू ग्रामीण लोकसभेच्या जागेसाठी भाजपचे सीएन मंजुनाथ हे विजयी झाले. मंजूनाथ हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुतणे आहेत. या जागेवर त्यांच्याविरोधात डीके सुरेश या चेहऱ्याला काँग्रसने संधी दिली. डी. के. सुरेश हेसुद्धा वोक्कलिंगा समुदायातून येत असून ते उपमुख्यमंत्री डी. के. सुरेश यांचे भाऊ आहेत. भाजपने दक्षिण कर्नाटकातील बहुतांश जागा राखण्यात यश मिळवले असले तरी कल्याण कर्नाटक प्रदेशातील जागा खेचून आणण्यात अपयशी ठरले. कर्नाटकमधून काँग्रेसच्या ९ जागांपैकी ५ कल्याण कर्नाटक प्रदेशातील आहेत.

 

Advertisement
Tags :
#loksabhaDK Shivakumar rkarnataka
Next Article