Karnataka : मकर संक्रांतीनंतर खुशखबर देणार! कुमारस्वामी यांचा लोकसभा जागावाटपावर गौप्यस्फोट
जेडीएस कीती जागा लढवणार आहे हे महत्वाचे नसून पक्षाने NDA च्या माध्यमातून राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले असल्याचा खुलासा जेडीएस नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत कर्नाटकातील जागा वाटपासंबंधीची आनंदाची बातमी मकर संक्रांतीनंतर देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अलिकडेच जेडी (एस) चे प्रदेशाध्यक्ष आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी JD(S) चे प्रमुख एचडी देवेगौडा यांच्यासह अलीकडेच दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत जेडीएस आणि भाजपच्या जागावाटपांवर चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना कुमारस्वामी यांनी संक्रांतीनंतर म्हणजेच १४ जानेवारीनंतर सगळ्यांना आनंदाची बातमी देणार असून त्यात कोणतीच अडचण नसल्याचे म्हटले आहे.
बंगळूरात माध्यमांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले कि, "आम्ही NDA चा भाग आहोत. त्यामुळे जेडीएसला कीती जागा मिळणार हा मुद्दा गौण आहे. त्यापेक्षा NDAम्हणून लोकसभेच्या 28 जागा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाजपच्या केंद्रिय नेर्तृत्वाबरोबर काय चर्चा झाली तसेच JDS ला किती जागा मिळाल्या याची खुशखबर मकर संक्रांतीनंतर कार्यकर्त्यांना देणार आहे" असेही त्यांनी म्हटले आहे.