Karnataka Election : सोनिया गांधींविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव
भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या माजी अध्यक्षां सोनिया गंधींनी ‘कर्नाटकच्या सार्वभौमत्वावर’ केलेल्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकी मतदानाच्या पार्श्वभुमीवर मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा >>>> मुस्लिम आरक्षण घटनाबाह्य असल्यानेच भाजपने काढून टाकले : अमित शहा
भाजपच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रीय राजधानीत असलेल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली. “सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक सार्वभौमत्व हा शब्द वापरला असून काँग्रेसचा जाहीरनामा हा 'तुकडे- तुकडे' टोळीचा अजेंडा असल्याने ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहेत. निवडणूक आयोग या देशविरोधी कृतीवर कारवाई नक्कीच कारवाई करेल आम्हाला आशा आहे.” असे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आयोगाच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांना सांगितले.
तसेच केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनीही सोनिया गांधींवर निशाणा साधून, "आज आम्ही सोनिया गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी हुबळी येथे केलेल्या भाषणात कर्नाटकच्या सार्वभौमत्वाबद्दल उद्गार काढले होते. आम्ही अखंड देशासाठी सार्वभौमत्वाचा वापर करतो. सोनिया गांधी या 'तुकडे-तुकडे' टोळीच्या प्रमुख आहेत. त्यामुळे निवडणुक आयोगाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवावा अशी आम्ही मागणी केली आहे." असे त्या म्हणाल्या.
शनिवारी कर्नाटकमधील हुबळी या जिल्ह्यात एका सभेला सोनिया गांधी यांनी संबोधित केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर झालेल्या पोस्टवर " कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी 6.5 कोटी कन्नडिगांना संदेश पाठवत आहेत : "काँग्रेस कर्नाटकच्या प्रतिष्ठेला, सार्वभौमत्वाला किंवा अखंडतेला धोका निर्माण करू देणार नाही." असे म्हटले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांनी या पोस्टवरून कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केल्याने राजकीय वादळ उठले.