कर्नाटक दैवज्ञ, न्यु गर्ल्स, एम.के.पाटील, भरतेश विजयी
शहापूर विभागीय थ्रोबॉल-व्हॉलिबॉल स्पर्धा
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते ज्ञान मंदिर स्कूल आयोजित शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत थ्रोबॉल विभागात कर्नाटक दैवज्ञने सेवंत डे संघाचा न्यू गर्ल्स संघाने चंपाबाई भोगले संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले तर व्हॉलिबॉलमध्ये एम. के. पाटील व भरतेश संघांनी विजेतेपद पटकावित तालुका स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, अनिल मुगळीकर, बापु देसाई, नामदेव जाधव, मुख्याध्यापक मोगन्नावर, सुधीर मानकोजी मान्यवरांच्या हस्ते नेटची पूजा करुन करण्यात आले. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटक दैवज्ञ संघाने अल्लअमीन संघाचा 25-17, 25-20 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सेवंत डे संघाने ज्ञान मंदिर संघाचा 25-19, 25-23 अशा गुण फरकाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत कर्नाटक दैवज्ञ संघाने 25-17, 25-18 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यु गर्ल्स संघाने पं. नेहरु संघाचा 25-15, 25-16 तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चंपाबाई भोगले संघाने कामधेनु संघाचा 25-20, 17-25, 15-12 अशा गुण पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत न्यु गर्ल्स संघाने चंपाबाई संघाचा 25-16, 23-25, 27-25 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात एम. के. पाटील संघाने डीआयसी चौगुले संघाचा 25-16, 25-18 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. तर मुलींच्या अंतिम सामन्यात भरतेश इंग्लिश संघाने उषाताई गोगटे संघाचा 25-21, 25-22 अशा सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून एस. आर. शिंगाडे, शंकर कोलकार, बोगार, कुंचनूर, मगदूम, मुजावर यांनी काम पाहिले.