महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्नाटक, आंध्र प्रदेश अंतिम फेरीत

06:17 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ काडाप्पा

Advertisement

हॉकी इंडियाच्या येथे सुरु असलेल्या कनिष्ठ पुरुष आणि महिलांच्या दक्षिण विभागीय चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेत मंगळवारी पाचव्या दिवशी कर्नाटक, आंध्र प्रदेश यांनी महिला गटात प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवित अंतिम फेरी गाठली. पुरुष विभागात कर्नाटक आणि तामिळनाडू यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली. मंगळवारी झालेल्या महिला गटातील सामन्यात कर्नाटकाने केरळचा 5-0 अशा गोल फरकाने पराभव केला. कर्नाटकातर्फे एम. दिशाने 2 गोल तर रक्षिता, मनिष पोनाम्मा व दीपिका यांनी प्रत्येकी 1 गोल केला. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्यात अंतिम लढत होईल, तर तामिळनाडू आणि केरळ यांच्यात बुधवारी तिसऱ्या स्थानासाठी सामना खेळवला जाणर आहे. दुसऱ्या एका सामन्यात तेलंगणाने पुडूचेरीचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. तेलंगणातर्फे कर्णधार के. अनिता आणि चितुरु संदिप यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. आंध्र प्रदेशने तामिळनाडूचा 6-2 असा पराभव केला. तामिळनाडूतर्फे युवा राणीने 2 गोल तर अंकिता, बोबली, कोठारी, जयशालिनी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

Advertisement

पुरुषांच्या विभागात तेलंगणाने पुडूचेरीचा 4-3 असा पराभव केला. या सामन्यात तेलंगणातर्फे कर्णधार मनोज अॅग्यूने शानदार हॅट्ट्रीक साधली. पुडूचेरीतर्फे कर्णधार किर्तीवासनने 2 गोल तर दर्शनने 1 गोल केला. तेलंगणाचा निर्णायक गोल नितीनने नोंदविला. कर्नाटकाने दुसऱ्या एका सामन्यात केरळचा 6-5 अशा गोल फरकाने निसटता पराभव केला. कर्नाटकातर्फे ध्रुवने 2 गोल तसेच शनमुखा, राजू गायकवाड, अचया, किरण रे•ाr यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. केरळतर्फे मिंझने 2 गोल तर मोहम्मद कैफ, कानन व राम यादव यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अन्य एका सामन्यात तामिळनाडूने आंध्रवर 3-0 अशा गोल फरकाने एकतर्फी मात केली. तामिळनाडूतर्फे कुबेरन, कमलेश आणि विशाल यांनी पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत गोल केले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article