Solapur News : करमाळेत नगरपरिषद निवडणुकीत मतमोजणीसाठी उत्सुकतेवर विरजण
नगरपरिषदेसाठी २१ डिसेंबरला होणार मतमोजणी
करमाळा : नगरपरिषदेसाठी २१ डिसेंबर रोजी मतमोजणी असल्याने सर्वांच्याच उत्सुकतेवर विरजण पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. निवडणूक संपली आणि शहरातील जनजीवन पूर्वीसारखेच एकमेकांसोबत हस्तांदोलन करून सुरू झाल्याचे दिसत आहे.
२१ डिसेंबर रोजी मतमोजणी असल्याने करमाळकरांची उत्सुकता ताणली गेली असली तरी जगताप, देवी, सावंत यांनी आमचाच विजय निश्चित असल्याचे दावे केले आहेत. करमाळा नगरपरिषद निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. किरकोळ घटना बगळता मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
करमाळानगरपरिषदमाडीतील बात नार्मी ऑफिस निवडणूकसुरूवातीपासूनच रंगतदार होईल, असे चित्र होते. करमाळ्याचे गट-तटावर चालणारे राजकारण पक्षीय पातळीवर गेले. अपवाद शहर विकास आघाडीचा सोडला तर तसे पाहता शहर विकास आघाडीत शिवसेना उबाठा सहभागी होतीच. भाजपने विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या पत्नीस उमेदवारी न देता सुनीता कन्हैयालाल देवी यांना उमेदवारी दिली होती.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनीदेवी जगताप यांनाउमेदवारी दिली.शहर विकास आघाडीकडून मोहिनी संजय सावंत या मैदानात होत्या. या तिन्ही उमेदवारांनी एकमेकास चांगलेच आव्हान दिले होते. सर्वांनीच जोरदार प्रचारात मुसंडी घेतली होती. प्रत्येक गटाचे समर्थक आपापल्या बाजूने बाताबरण निर्मिती करून इतर मतदार प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून होते.