For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारगिलचा ऐतिहासिक मार्ग लुप्त होण्याच्या वाटेवर

06:37 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारगिलचा ऐतिहासिक मार्ग लुप्त होण्याच्या वाटेवर
Advertisement

एक ग्लेशियर सरोवर ठरत आहे धोका

Advertisement

कारगिलमधील किछूर गावापासून काही अंतरावरच नागमिथोंग नालाचा कालापरी कॅम्प आहे. हे ठिकाण सुमारे 12,800 फुटांच्या उंचीवर आहे. येथे 20-24 ऑगस्ट या कालावधीत आयआयटी रुडकीमधील सहाय्यक प्राध्यापक सौरभ विजय यांच्यासोबत आयआयएसईआर-पुण्यातील सहाय्यक प्राध्यापिका अर्घा बॅनर्जी अणि संशोधक कृष्णानंद जे. देखील होते. याचबरोबर 7 अन्य वैज्ञानिक देखील या टीमचा हिस्सा होते. ग्लेशियर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ग्लेशियल सरोवरांचे अध्ययन करणे हा यामागील उद्देश होता. याकरता त्यांना पानीखर गावातील लोक आणि त्यांच्या घोड्यांनी साथ दिली.

खोऱ्यातील ग्लेशियरल, ग्लेशियल सरोवर, ग्लेशियरमधून वितळणारे पाणी अणि स्थानिक हवामानाचे या टीमने अध्ययन केले. खोऱ्यातील या सर्वांचे एकत्र अध्ययन केल्याने अधिक विस्तृत माहिती मिळू शकली आही. याकरता लामो ग्लेशियरनजीक ऑटोमॅटिक टाइम लॅप्स कॅमेरा सिस्टीम बसविण्यात आली असून ती सर्व ऋतूंमध्ये ग्लेशियर आणि त्याच्या वितळण्याने निर्माण झालेल्या सरोवरावर नजर ठेवू शकणार आहे.

Advertisement

या सरोवराचा आकार मागील तीन दशकांमध्ये 25 पटीने वाढला आहे. या सरोवराचे क्षेत्रफळ सुमारे 5 लाख चौरस मीटर आहे. यात सुमारे 500 कोटी लिटर पाणी आहे. इतके पाणी पूर्ण लडाखच्या 6 महिन्यांची गरज पूर्ण करू शकते. परंतु इतके पाणी आणि इतक्या उंचीवर वाढणारे सरोवर धोकादायक देखील आहे.

फ्लॅश फ्लडचा धोका

हे सरोवर कुठल्याही क्षणी ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लडचे कारण ठरू शकते. 2013 मध्ये केदारनाथ खोऱ्यात तर 2023 मध्ये सिक्कीममध्ये आणि अलिकडेच नेपाळमध्ये अशाप्रकारची घटना दिसून आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भारतीय हिमालयात अशा ग्लेशियल लेक्सची ओळख पटवत आहे, जे भविष्यात धोकादायक ठरू शकतात.

काश्मीर अन् लडाखला जोडणारा मार्ग

या सरोवरानजीक यंत्रं बसविताता आणि तेथे जाताना अनेक स्थानिक लोक भेटले. तसेच काही अॅडव्हेंचरच्या शोधात गेलेले हायकर्सही भेटले. हे सर्व जण चालोंग आणि वारवान खोऱ्याचा प्रवास बोटकोल खिंडीतून करत होते. बटकोल खिंड सरोवरापासून 100 मीटर उंचीवर आहे. ही खिंड लामो ग्लेशियरजवळून जाते. शतकांपासून लोक काश्मीरमधून लडाखला येण्यासाठी या मार्गाचा वापर करत आले आहेत. हा मार्ग अत्यंत धोकादायक आहे, तसेच सरोवर फैलावल्याने या मार्गावरील धोका आणखी अनेक पटीने वाढत असल्याचे अर्घा बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

सिक्कीम, नेपाळमधील आपत्ती

मागील वर्षी सिक्कीममध्ये अशाप्रकारेच ग्लेशियर लेक फुटला होता. अलिकडेच नेपाळच्या शेर्पांचे एक गाव अशाच आपत्तीचे शिकार ठरले. यामुळे सरकार आणि लोकांचे लक्ष या आपत्तीकडे गेले. हिमालयात ग्लेशियल लेक्स फुटल्याने फ्लॅश फ्लडचा धोका वाढत असल्याचा अनुमान वैज्ञानिकांनी यापूर्वीच व्यक्त केला होता.

अनेक कारणे

ग्लेशियल लेक्स फुटण्यामागे जागतिक तापमानवाढ कारण असू शकते, तसेच भूस्खलनही कारणीभूत ठरू शकते. तसेच सरोवराचा आकार वाढल्याने त्याची भिंत तुटू शकते. याचमुळे भारतीय वैज्ञानिक आता ग्लेशियल लेक्सची ओळख पटवू लागले आहेत.

Advertisement
Tags :

.