कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्जुन कपूरसोबत पुन्हा झळकणार करिना

06:10 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर दीर्घकाळापासून एका हिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुन कपूरची मुख्य भूमिका असलेले चित्रपट मागील काही काळात फ्लॉप ठरले आहेत. परंतु पुन्हा एकदा अर्जुन कपूरच्या कारकीर्दीत आशेचा किरण निर्माण झाला आहे, कारण त्याची जोडी करिना कपूरसोबत जमणार आहे.

Advertisement

Advertisement

करिना आणि अर्जुन यांनी यापूर्वी 2016 मध्ये प्रदर्शित ‘की एंड का’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनातील या चित्रपटाच्या कहाणीला लोकांची पसंती मिळाली होती. अर्जुन आणि करिना पुन्हा एकदा ‘की अँड का 2’ चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.

करिना कपूरही मागील काही काळापासून मोठ्या हिटची आशा करत आहे. तर करिना कपूरसोबत काम करता येणार असल्याने अर्जुन हिट चित्रपटाची अपेक्षा करत आहे. करिना कपूर याचबरोबर आणखी काही चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे, परंतु अर्जुन कपूरकडे फारसे चित्रपट नसल्याने तो करिनासोबतच्या चित्रपटावर लक्ष केंद्रीत करून असल्याचे समजते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article