‘दायरा’मध्ये करिना
पृथ्वीराज सुकुमारनसोबत झळकणार
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर लवकरच एक क्राइम ड्रामा चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार देखील दिसून येणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. पृथ्वीराजने सोशल मीडियावर काही छायाचित्रे शेअर केली असून यात तो दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि करिना कपूरसोबत दिसून येत आहे. एका छायाचित्रात तिघेही गंभीर संभाषण करत असल्याचे दिसून येते. या छायाचित्रांसोबत पृथ्वीराजने कॅप्शन दिली असून यात ‘काही कहाण्या जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हापासून त्या तुमच्या साथीदार ठरतात. माझ्यासाठी दायरा ही कहाणी अशीच आहे. मेघना गुलजार अन् करिनासोबत काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे’ पृथ्वीराजने नमूद केले आहे. दिग्दर्शकानुसार काम करत असल्याचे मी नेहमी म्हणते. यावेळी मला बॉलिवूडमधील सर्वात सक्षम दिग्दर्शकांपैकी एक मेघना गुलजार आणि उत्तम अभिनेता पृथ्वीराजसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ही माझी ड्रीम टीम असल्याचे करिनाने म्हटले आहे.