कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारवारमध्ये 4 मे पासून करावळी उत्सव

09:50 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार : संपूर्ण जिल्हावासियांसह अन्य जिल्ह्यातील आणि दक्षिण गोव्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रीय पातळीवरील करावळी उत्सवाचे आयोजन येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर 4 ते 8 मेपर्यंत करण्यात आले आहे, अशी माहिती कारवार अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी दिली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या करावळी उत्सव पूर्वतयारी बैठकीत बोलताना सैल पुढे म्हणाले, सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनु निगमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध कलाकार या उत्सवात हजेरी लावणार आहेत. करावळी उत्सवातील प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावरील भव्य आणि दिव्य मयुर वर्मा व्यासपीठावर संपन्न होणार आहे. 4तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते कार्यक्रमाला चालना देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पर्यटन मंत्री, कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांसह जिल्ह्यातील खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य उत्सवाला हजेरी लावणार आहेत.

Advertisement

4 तारखेला सोनू निगमच्या गायनाचा कार्यक्रम

Advertisement

करावळी उत्सवाबद्दल माहिती देताना सैल म्हणाले, उत्सवाच्या पहिल्यादिवशी म्हणजे दि. 4 रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. 5 मे रोजी इंडियन आयडॉल ख्यातीचे मोहम्मद दानीश, 6 मे रोजी सुप्रसिद्ध गायक मिका सिंग, 7 मे रोजी अनन्या भट आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवशी 8 मे रोजी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. उत्सवादरम्यान महिलांसाठी करावळी रन, रांगोळी स्पर्धा, भिंतीवर चित्र काढण्याची स्पर्धा, मासेमारी बांधवांसाठी होडी स्पर्धा, किनारपट्टी आहार पदार्थ तयार करण्याची स्पर्धा, कब•ाr स्पर्धा, पाळीव प्राणी प्रदर्शन, एलईडी पतंग स्पर्धा आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. करावळी उत्सवाच्यावेळी येथील सर्व सरकारी इमारतीवर आणि खासगी व्यावसायिक आस्थापनांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याची सूचना आमदार सतीश सैल यांनी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article