कराटेपटूंचा शिक्षण खात्यातर्फे सत्कार
बेळगाव : चिक्कबळ्ळापुर येथील जिल्हा क्रीडांगणाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या 17 वर्षाखालील मुला मुलींच्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या जिल्हा कराटे क्रीडा संघटनेच्या व कम्प्लीट कराटे अकादमीच्या खेळाडूंनी 1 सुवर्ण 1 रौप्य 1 कांस्यपदक पटकविले आहे. या पदक विजेत्यांचा सत्कार बेळगाव शिक्षण खात्यातर्फे करण्यात आला. या स्पर्धेत मुलींच्या गटात 80 किलोवरील गटात माही कंग्राळकरने सुवर्ण मिळविले असून तिची ग्वालियर येथे होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेसाठी तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तसेच 68 किलो वजनी गटात उमेश्वरी कावळेने रौप्यपदक पटकाविले तर 54 किलो वजनी गटात प्रज्वल पाटीलने कांस्यपदक मिळविले. या कराटेपटूंना जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, जुनेदी पटेल, पीईओ जहिदा पटेल, जितेंद्र काकतीकर, नंदिनी गावडे, संघ व्यवस्थापक अब्दुल रजाक मुल्ला या मान्यवरांचे हस्ते कराटेपटूंचा सत्कार करण्यात आला.