करणबीर सिंगचा टी-20 मध्ये नवा विक्रम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑस्ट्रीयाच्या क्रिकेट संघातील फलंदाज करणबीर सिंगने 2025 च्या क्रिकेट हंगामात टी-20 प्रकारात भारताच्या सूर्यकुमार यादव आणि पाकच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत सर्वाधिक म्हणजे 1488 धावा नोंदविण्याचा नवा विक्रम केला आहे.
रुमानियाच्या दौऱ्यावर ऑस्ट्रीयाचा संघ गेला होता. हा दौरा सुरू होण्यापूर्वी करणबीर सिंगला रिझवानचा यापूर्वीचा विक्रम मोडण्यासाठी 87 धावांची जरुरी होती. पाकच्या मोहम्मद रिझवानने 2021 च्या क्रिकेट हंगामात टी-20 प्रकारात 1326 धावा जमविल्या होत्या. रुमानियाच्या दौऱ्यातील झालेल्या सामन्यात करणबीर सिंगने 27 चेंडूत 57 धावा जमविल्या. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने 46 चेंडूत 90 धावा झोडपल्या. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात 44 चेंडूत 74 धावा तर शेवटच्या सामन्यात 12 चेंडूत 27 धावा जमविल्याने त्याने 32 डावांत 1488 धावा नोंदविण्याचा नवा विक्रम केला आहे. भारताचा सूर्यकुमार यादवने 2022 साली सर्वाधिक म्हणजे 68 षटकारांचा विक्रम केला होता. पण करणबीर सिंगने 2025 च्या क्रिकेट हंगामात आतापर्यंत 122 षटकारांची नोंद करत यादवचा विक्रम मोडीत काढला आहे.