महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्टेरींग राॅड तुटल्याने कराड- चोरजवाडी बसला अपघात; ५ विद्यार्थी जखमी

06:11 PM Aug 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

उंब्रज/प्रतिनिधी

हिंगनोळे ता. कराड गावच्या हद्दीत एसटी बसचा स्टेरींग राॅड तुटल्याने बस नाल्यात आदळून अपघात झाल्याची घटना बुधवारी ३१ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे हिंगनोळे येथील ग्रामस्थांनी सांगितले. चोरजवाडी ते कराड बसला अपघात झाल्याची ही घटना घडली.

Advertisement

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, हिंगनोळे येथे झरे वस्ती समोर चोरे ते उंब्रज येणाऱ्या मार्गावर एसटी बसला अपघात झाला. सकाळची वेळ असल्याने उंब्रज येथे काॅलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एसटी फुल्ल भरली होती. हिंगनोळे गावच्या हद्दीत एसटी आल्यानंतर एसटीचा स्टेरींग राॅड अचानक तुटला त्यामुळे भीतीदायक चित्र निर्माण झाले. एसटीत विद्यार्थ्याचा एकच गोंधळ उडाला. मात्र प्रसंगावधान राखून चालकाने गाडी नाल्यात ओढली. त्यामुळे बस पलटी झाली नाही. व सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघात पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उंब्रज येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चालकाच्या या कामगारिचे घटनास्थळी आलेल्या ग्रामस्थांनी कौतुक केले

Advertisement

Advertisement
Tags :
broken steeringbus accidentKarad- Chorjawadistudents injured
Next Article