महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काणका येथे कपेलची फंडपेटी फोडली

12:41 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंदाजे 30 हजारांची रोकड लंपास, म्हापसा पोलिसांत तक्रार

Advertisement

म्हापसा : काणका पर्रा मुख्य रस्त्याच्या बाजूला मटण शॉपजवळ असलेल्या सेंट सेबीस्तीयन कपेलमधील फंडपेटी फोडून आतील रोख ऊपये चोरट्यांनी पळविले. आतमध्ये अंदाजे 30 हजार ऊपये असावे अशी माहिती कपेलचे सचिव जोकीम डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. फंडपेटीमध्ये 700 व आजूबाजूला शंभराच्या पाच नोटा आढळून आल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी हे पैसे त्याठिकाणी का ठेवले याबाबत पोलीसही चक्रावून गेले आहेत.शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काणका मटण शॉपच्या बाजूलाच एक सेंट सेबीस्तीयन कपेल असून रात्री चोरट्यांनी या कपेलच्या मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. फंडपेटी फोडून आतील रोख ऊपये पळविल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisement

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर शिपाई प्रकाश पोवळेकर, राजेश कांदोळकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी याबाबत पंचनामा केला. येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराही पडताळून पाहिले. श्वान पथकाचा वापर केला. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेराच्या वायर्स तोडून आतमध्ये प्रवेश केला असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, रात्री ही चोरी झाली असून फंडपेटीत अंदाजे रु. 30 हजाराच्या आसपास असलेली रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. महिन्याभरात अंदाजे रु. 10 हजार येथे देणगी ऊपाने मिळतात. गेल्या तीन महिन्यापासून फंडपेटी उघडली नव्हती. याबबात लेखी तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात दिल्याचे कपेलचे सचिव जोकीम डिसोझा यांनी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article