महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठी जाहिरात फलकांविरोधात कन्नड संघटनेची पुन्हा कोल्हेकुई

11:55 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महानगरपालिकेसमोर आंदोलन; साऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न : जनतेतून संताप

Advertisement

बेळगाव : शहरामध्ये मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे जाहिराती या मराठीमध्ये केल्या जातात. मात्र त्यामुळे कन्नड संघटनेच्या मूठभर कार्यकर्त्यांना पोटशूळ झाला असून सोमवारी महानगरपालिकेसमोर आंदोलन करून साऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कन्नडमध्ये जाहिरात फलक लावा, अन्यथा आम्ही स्वत: काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र इतर भाषिकांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यापूर्वीही अनेकवेळा अशाप्रकारे दडपशाही करण्यात आली आहे. यामुळे बेळगावच्या समस्त जनतेतून संताप उमटू लागला आहे. शहर व सीमाभागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक राहतात. तसेच इतर भाषिकही राहत आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. मात्र कन्नड संघटना आपले वर्चस्व दाखविण्यासाठी नेहमीच अशाप्रकारे जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे. आंदोलन समस्या निवारणासाठी करा, इतर भाषिकांना लक्ष्य बनविण्यासाठी करू नका, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Advertisement

केवळ शहरातील वातावरण बिघडविण्याचे काम

शहरामध्ये अनेक समस्या आहेत. त्याबाबत या कन्नड संघटना कधीच आंदोलन करीत नाहीत. त्यासाठी मराठी भाषिक असलेल्या संघटनाच रस्त्यावर उतरत आहेत. भ्रष्टाचाराविरोधातही या कन्नड संघटना एक चक्कार शब्दही काढत नाहीत. केवळ शहरातील वातावरण बिघडविण्याचे काम या संघटना करत असल्याचा आरोप आता होत आहे. सोमवारी मनपाच्या प्रवेशद्वारासमोरच लाल-पिवळ्या रंगाचे झेंडे घेऊन या कार्यकर्त्यांनी ठाण मांडले. मात्र त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागला. मोजकेच कार्यकर्ते होते, पण त्यांच्यापेक्षा पोलीसच अधिक तैनात करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article