महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नव्या आयुक्तांचे कन्नडसक्तीचे फर्मान

01:12 PM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मराठी भाषिकांचा ओढवून घेतला रोष

Advertisement

बेळगाव : महापालिका आयुक्तपदी नियुक्त झालेल्या शुभा बी. यांनी पहिल्याच दिवशी कन्नड सक्तीबाबत सुतोवाच केल्याने मराठी भाषिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. बेळगावमध्ये कन्नड भाषेला प्राधान्य देण्याबरोबरच सर्व आस्थापने व दुकानांवर 60 टक्के कन्नड नामफलक लावणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने बेळगावकरांना पुन्हा एकदा कन्नडसक्तीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आयुक्तांनी मंगळवारी पदभार स्वीकारून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कन्नडसक्तीबाबत स्पष्ट माहिती दिली. महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कन्नडध्वज रंगातील ओळखपत्र परिधान करावे लागणार आहे. कन्नड फलक असतील तर व्यवसाय परव्यानांना मंजुरी दिली जाणार आहे. त्याचबरोबर कन्नड भाषेतील फलक लावण्यासाठी जागृतीही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

बेळगाव शहरात मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक असतानाही केवळ आपला हक्क दाखवून देण्यासाठी वारंवार कन्नडसक्तीचा वरवंटा फिरविला जातो. सहा महिन्यांपूर्वी कन्नड फलकांबाबत मोहीम उघडून मराठी भाषिकांचे व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी मराठी भाषिक संघटनांनी जोरदार विरोध केल्यानंतर कन्नडसक्ती मंदावली होती. परंतु आता नव्या आयुक्तांनी पुन्हा कन्नडसक्तीची वल्गना केल्याने मराठी भाषिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहराचा विकास करताना कन्नडसह मराठी भाषिकांनाही सामावून घेणे गरजेचे आहे. शहराविषयी संपूर्ण माहिती जाणून न घेताच आयुक्तांनी कन्नडसक्तीबाबत वक्तव्य केल्याने मराठी भाषिक नाराज आहेत. त्यामुळे यापुढे तरी भाषिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, याची दखल आयुक्तांनी घ्यावी.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article