कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कन्नड अभिनेते उमेश यांचे निधन

11:23 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : ज्येष्ठ कन्नड विनोदी अभिनेते एम. एस. उमेश (वय 80) यांचे रविवारी कर्करोगामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून उमेश यांच्यावर बेंगळूरच्या किडवाई  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने सकाळी 8:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उमेश यांच्या पार्थिवावर बेंगळूरच्या बनशंकरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उमेश हे 1948 पासून नाटके आणि चित्रपटांमध्ये सक्रिय होते. 1960 मध्ये बी. आर. पंथुलू दिग्दर्शित ‘बाल राज्य’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article