कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंग्राळी क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

06:01 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक

Advertisement

कंग्राळी बुद्रुक यकुब युवक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने ठेवण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे शानदर उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते किरण कोल्ले होते.

Advertisement

प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.प. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, सदस्य जयराम पाटील, नवनाथ पुजारी, अनिल पावशे, दादासाहेब भदरगेड, रेखा इंदिकर, सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा पाटील उपस्थित होते. प्रमुख देणगीदार म्हणून कार्तिक चिखलकर, सिद्धार्थ मंगाण्णाचे उपस्थित होते. प्रारंभी प्रशांत पवार यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. ग्रा.पं. अध्यक्ष रोहिणी नाथबुवा व इतर मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन श्रीफळ वाढवून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

विजेत्या संघाला कार्तिक चिखलकर यांच्याकडून 15000 रुपये तर उपविजेत्या संघाला सिद्धार्थ मंगण्णाचे यांच्याकडून 7000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी कल्लाप्पा पाटील, किरण कोल्ले, महादेव पाटील, प्रभाकर पाटील, प्रभाकर बेळगावकरसह युवक मंडळ व युनिक स्पोर्ट्सचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article