महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कंग्राळी बुद्रुकमधील चौक बनलाय मृत्यूचा सापळा

10:26 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रस्त्यावर दोन ठिकाणी गतिरोधक बसवून वाहनधारक-पादचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक 

Advertisement

कंग्राळी बुद्रूक येथील ग्राम पंचायतीच्या दुकान गाळ्यांना लागून बांधलेल्या स्मार्ट बसथांब्याजवळील चौक हा वाहनधारक व पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावरच शासनाचे डोळे उघडणार काय? यामुळे सदर चौकातील मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी गतिरोधक बसवून वाहनधारक व पादचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक गावाला राज्य परिवहन मंडळ विभागाकडून शाहूनगरमार्गे तसेच केएलई हॉस्पिटलमार्गे दोन्ही बाजूने अर्धातासाला बस सोडून विद्यार्थी वर्गाबरोबर इतर प्रवासीवर्गाची चांगली सोय झाली आहे. श्री कलमेश्वर सोसायटीजवळील चौक हा वाढीव गावच्या दृष्टीने मध्य चौक बनल्यामुळे ग्राम पंचायतीने शासकीय ग्राम पंचायत फंडातून दुकान गाळ्यांना लागून स्मार्ट बसथांब्याची निर्मिती केली आहे.

गावचा हा सध्या मुख्य चौक बनल्यामुळे या ठिकाणी किराणा दुकाने, चहा कॅन्टीन मोफत शासकीय वाचनालयासह इतर दुकाने असल्यामुळे सदर चौक नागरिकांनी नेहमी गजबजलेला असतो. त्यातच प्रवासी वर्गसुद्धा याच चौकामध्ये बाजूला बसच्या प्रतीक्षेत थांबत असल्यामुळे या ठिकाणी नेहमी गर्दी असते. त्यातच याठिकाणी रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे सदर रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक सुसाट वाहने चालवत असतात. यामुळे सदर चौकामध्ये लहान मोठे नेहमी अपघात घडत असतात. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रा. पं. अधिकारी व सदस्यांच्या नजरेस या समस्या न येणे ही खेदाची बाब आहे. मध्यंतरी येथील प्रवासी रिक्षाचालकांनी गतिरोधक बसविण्याची कल्पना ग्रा.पं. सदस्य व इतरांच्या नजरेस आणून दिली होती. तसेच स्वत: गतिरोधक बसविण्याची तयारी दर्शविली.परंतु त्यांना कुणी प्रतिसाद न दिल्यामुळे गतिरोधक बसविणे थांबल्याच्याही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

किरकोळ अपघातांची मालिका सुरूच 

सदर चौक कायम नागरिक व प्रवासी वर्गामुळे गजबजलेला असतो. त्यातच चौकातील एकाही रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे वाहनधारक वाहने सुसाट चालवत आहेत. यामुळे सदर चौकामध्ये लहान लहान अपघात होतच राहतात.  परंतु शनिवारी एक बालक शाळेला तीन दिवस सुटी असल्यामुळे आपली आई व लहान भावाबरोबर आपल्या मामाच्या गावी जाण्यासाठी सदर चौकात रस्त्याशेजारी थांबला असता एका सुसाट दुचाकीस्वाराने त्या बालकाला धडक दिल्यामुळे त्याच्या पायाला जबर दुखापत झाली.अन् त्याला एका खासगी दवाखान्यात दाखल व्हावे लागले. जर चौकातील रस्त्यावर दोन्ही बाजूने गतिरोधक बसविले असते तर शनिवारची घटना घडलीच नसती व अन्य घटनाही घडल्या नसत्या. तेव्हा संबंधीत याकडे लक्ष देऊन सदर चौकामधील रस्त्यावर गतिरोधक बसवून दिलासा देण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article