कांगारूंचा इंग्लंडवर 6 गड्यांनी विजय
वृत्तसंस्था/इंदोर
आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात गार्डनरचे शतक आणि सदरलँडच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंड महिला संघाचा 6 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील इंग्लंडचा हा पहिला पराभव आहे. दरम्यान या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 50 षटकात 9 बाद 244 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले. मात्र ऑस्ट्रेलियाने 40.3 षटकात 4 बाद 248 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी आरामात जिंकला.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या बिमॉन्टने 105 चेंडूत 78 धावांची खेळी केली. अॅलिसी कॅप्सेने 32 चेंडूत 38 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे अॅनाबेल सदरलँडने 60 धावांत 3 तर मॉलिन्युक्सने 52 धावांत तसेच अॅस्ले गार्डनरने 39 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 40.3 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 248 धावा जमवित आणखीन एक शानदार विजय नोंदविला. गार्डनरने 73 चेंडूत नाबाद 104 धावा झोडपल्या. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गार्डनरचे हे सर्वात जलद शतक आहे. तिने यापूर्वी विंडीजच्या डॉटीनने 2017 साली 71 चेंडूत पाकविरुद्ध जलद शतक झळकविले होते. पण गार्डनरने 69 चेंडूत डॉटीनचा विक्रम मोडीत काढला. सदरलँडने 112 चेंडूत नाबाद 98 धावा झळकविल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 50 षटकात 9 बाद 244 (बिमॉन्ट 78, कॅप्से 38, सदरलँड 3-60, मॉलिन्युक्स 2-52, गार्डनर 2-39), ऑस्ट्रेलिया 40.3 षटकात 4 बाद 248 (सदरलँड नाबाद 98, गार्डनर नाबाद 104)