कंगना राणावतला भाजपकडून उमेदवारी! आपल्या मुळगाव मंडीमधून मिळाले तिकिट
भारतीय जनता पक्षाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिले आहे. भाजपने लोकसभेसाठीच्या आपल्या 5 व्या उमेदवारांच्या यादीत 111 उमेदवार जाहीर करताना कंगना राणावत यांच्या व्यतिरिक्त रामायण या लोकप्रिय मालिकेतील चरित्रअभिनेता अरुण गोविल यांचेही मनोरंजन क्षेत्रातून नाव पुढे आले असून त्यांना मेरठ या लोकसभेच्या जागेवरून तिकीट देण्यात आले आहे. या शिवाय नवीन जिंदाल, मनेका गांधी यांच्य़ाही नावाचा समावेश आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी या जिल्ह्यातून आलेल्या कंगना राणावतने बॉलीवूडमध्ये चांगलाच जम बसवला. तिने अनेक चित्रपटामध्ये काम केल्यानंतर काही चित्रपटांमध्ये तिने मुख्य भुमिका निभावल्या. त्यासाठी तिला अनेक राष्ट्रिय पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर तिने वेळोवेळी भाजपच्या अनेक योजना आणि कार्यक्रमांची पाठराखण करून भाजपकडून लोकसभेसाठी उच्छुक असल्याच सांगितले होते.
तिकिट जाहिर झाल्यानंतर आपल्या ट्विटर अकाउंटवर आनंद व्यक्त करताना कंगणाने म्हटलं आहे कि, "भारतीय जनता पक्षाला मी नेहमीच पाठींबा दिला आहे. भाजपच्या केंद्रिय नेर्तृत्वाने आज माझ्या नावाची घोषणा करून माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. मंडी ही माझी जन्मभुमी असल्याने मला याचा खुप आनंद झाला आहे. मी भारावून गेलो आहे. हा माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. मी भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते." असेही कंगणाने म्हटले आहे.