करवीर तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कणेरीस विजेतेपद
कोल्हापूर :
करवीर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने कोगे येथे आयोजित केलेल्या करवीर तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कणेरी केंद्रास विजेतेपद तर नागदेवाडी केंद्रास उपविजेतेपद मिळाले. या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुंभी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन विश्वास दत्तात्रय पाटील ,कोगे गावचे सरपंच वंदना इंगवले, कुंभी बँकेचे संचालक रणजीत पाटील आदी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील, विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर ,प्रकाश आंग्रे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रदीप पाटील भुयेकर यांचे वतीने शिल्ड व प्रशस्तीपत्रे देण्यात आली.समूहनृत्य व समूहगीत स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना कोगे येथील तानाजी मिठारी यांनी गणेशाची चांदीची मूर्ती बक्षीस दिली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी मानकर, केंद्रप्रमुख राणेश्वर थोरबोले, रमेश निगवेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष टी.एन. पाटील, सुहास पाटील, संजय मोरे ,तानाजी मिठारी, सौरभ पाटील उपस्थित होते.
कोगे शाळेचे मुख्याध्यापक संभाजी एकशिंगे,मुख्याध्यापिका संगीता यादव, शिवाजी बागडी, आदींनी स्पर्धेचे नियोजन केले.